Story outline
-
एलेफंटा लेणी
हिंदू धर्मात शंकराचे महत्त्व लक्षात घेता, एलेफंटा येथील मुख्य गुंफा हा सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तसेच पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या गुंफा-मंदिरात सोळा मूर्त्या असून त्यापैकी नऊ मुख्य सभागृहात आहेत. या बहुतेक मूर्ती गाभाऱ्याच्या आसपासच्या डोंगरातील नैसर्गिक खडकातून उभ्या कोरल्या आहेत. या कलाकृती केवळ धार्मिक नव्हे तर कलात्मक वारसाही दाखवतात. -
Stop 1. गुहेच्या मंदिराची रचना
एलेफंटा किंवा घरापुरी (गुंफांची नगरी) हे मुंबईच्या किनाऱ्यापासून 11 किमी अंतरावर स्थित असून भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. येथील खडकात कोरलेली गुंफा-मंदिरे इ.स. 6 व्या ते 8 व्या शतकातील खडकात कोरीव मंदिर वास्तुकलेची उत्कृष्ट उदाहरणे असून त्या काळातील अभियांत्रिकी, वास्तुकला आणि कलाशैलीची साक्ष देतात. -
Stop 2. सांसारिक गोष्टींपासून दैवी गोष्टींकडे
मंदिरे विश्वाचे प्रतिरूप मानली जातात आणि ती मनुष्य व दैवी यांमध्ये दुवा निर्माण करणारी पवित्र जागा असतात—म्हणजेच मुक्तीकडे (मोक्षाकडे) जाणारी आध्यात्मिक यात्रा. या यात्रेतील प्रत्येक टप्पा मंदिरातील घटकांमधून प्रतीकात्मक पद्धतीने दर्शविला जातो. -
Stop 3. रावणनुग्रह - रावणाने कैलास पर्वताला हादरवणे
हिंदू धर्मात कैलास पर्वताला अत्यंत महत्त्व आहे कारण तो शंकराचे निवासस्थान मानला जातो. विश्वाच्या पारलौकिक परिमाणात स्थित या पर्वताच्या शिखरावर शंकर सतत ध्यानमग्न अवस्थेत विराजमान असून तेथून विश्वभरात ऊर्जा प्रेषित करतात. हा पवित्र पर्वत विश्वाचा अक्ष (axis mundi) आणि स्वर्गाकडे जाणारी पायरी मानला जातो. -
Stop 4. सदाशिव - शाश्वत शिव
सदाशिवाची मोठी प्रतिमा चार मुखांपैकी तीन मुखांचे दर्शन घडवते. चौथे गृहित धरलेले मुख मागे असून पाचवे मुख वरती आहे. ही दोन मुखे क्रमशः सद्योजात (शंकराचे पहिले रूप) व ईशान (शंकराचे सर्वोच्च रूप) मानली जातात. दिसणाऱ्या प्रत्येक मुखामधून शंकराच्या स्वभावाचा एक भाग व त्याचे विशिष्ट गुण दर्शविलेले आहेत. -
Stop 5. गंगाधर - गंगा धारण करणारा शिव
गंगा नदी सर्वात पवित्र मानली जाते व पवित्रतेचे प्रतीक आहे. ती शंकराच्या जटेतून उत्पन्न झाली असे मानले जाते, जे स्वर्गातून पृथ्वीवर उतरलेल्या जीवनदायी जलाचे दैवी प्रतिक आहे. हिंदूंच्या मते गंगा ही केवळ नदी नसून आत्म्याचे शुद्धीकरण करणारी, पापांचे शमन करणारी आणि मोक्षमार्ग सुकर करणारी देवी आहे. -
Stop 6. अर्धनारीश्वर - शिवाचे उभयलिंगी रूप
अर्धनारीश्वर हे शंकराचे अर्ध-स्त्री अर्ध-पुरुष रूप असून पुरुष आणि स्त्री तत्त्वाच्या एकरूपतेचे प्रतीक आहे. हे अंतिम मिलन चेतन व अवचेतन ऊर्जांच्या संगमाचे सूचक असून विरोधाभासी पण परस्परपूरक तत्त्वांचे संतुलन दर्शवते. -
Stop 7. मंदिराचे गर्भगृह
गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना असून ते शंकराचे निराकार रूप आहे. गर्भगृहाला चार दिशांना चार प्रवेशद्वारे असून प्रत्येक प्रवेशद्वारावर भव्य द्वारपाल उभे आहेत. हे आठ द्वारपाल विशाल आकाराचे असून त्यांच्या अंगावरील अलंकारांनी त्यांची भव्यता आणखी वाढते. -
Stop 8. पाणी साठवणे
पाणी साठवण्याचे जलकुंड सरळ खडकात कोरलेले असून ते पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी वापरले जात असे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाचे पाणी त्यात साचत असे व उरलेल्या वर्षभर वापरले जाई. -
Stop 9. निष्कर्ष
शंकराची सृष्टी व संहार अशी दोन्ही तत्त्वे मानली जातात आणि त्यामुळे विश्वातील संतुलन साधले जाते. मुख्य गुंफेत आढळणाऱ्या शिल्प-पट्टांत शंकराशी संबंधित विविध कथा व तत्त्वे दर्शविली आहेत. विरुद्ध विषय असलेली पॅनेल्स एकमेकांसमोर कोरल्याने संतुलनाची संकल्पना अधिक प्रभावी होते.
आवाज
-
डॉ. कुरूष फिरोज दलाल
पुरातत्वज्ञ
डॉ. कुरुश फ़िरोज़ दलाल, इन्स्तुकेन ट्रस्ट में पुरातत्व विद्यालय के निदेशक हैं। उन्होंने मुंबई विश्वविद्यालय से प्राचीन भारतीय इतिहास तथा इतिहास में बीए, डेक्कन कॉलेज, पुणे विश्वविद्यालय से पुरातत्व में एमए के साथ-साथ, राजस्थान में प्रारंभिक लौह युग विषय से पीएच.डी. की है। इसके बाद, उन्होंने मुख्य तौर से भारत के पश्चिमी तटों पर प्रारंभिक मध्ययुगीन काल पर ध्यान केंद्रित किया, और संजन, चंदोर और मंडाद की साइटों की खुदाई की। इन खुदाइयों और इससे मिले आंकड़ों का इस क्षेत्र में स्कालर्शिप या विद्वत्ता पर गहरा असर पड़ा है। हाल ही में मंडाद की खुदाई से एक बिल्कुल नए अज्ञात इंडो-रोमन बंदरगाह स्थल का पता चला है, जिसका इतिहास और भी प्राचीन है। डॉ. दलाल सक्रिय रूप से भारत में मेमोरियल स्टोन्स और ऐस-कर्स स्टोन्स पर तथा मुद्राशास्त्र, रक्षा पुरातत्व, वास्तुशिल्प, नृवंशविज्ञान या एथनो-पुरातत्व और संबधित विषयों पर भी काम करते हैं। -
डॉ. बैपटिस्टा
पुरातत्वज्ञ
डॉ. बैपटिस्टा प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृति और पुरातत्व के व्याख्याता और सलाहकार हैं। उनकी अनुसंधान रुचियों में एक तरफ प्रागितिहास, मानव-भूमि संबंध, परिदृश्य विकास और दूसरी तरफ औपनिवेशिक इतिहास, शहरी विकास और सामाजिक-सांस्कृतिक स्थलों को आकार देना शामिल है। उन्होंने डेक्कन कॉलेज स्नातकोत्तर और अनुसंधान संस्थान, पुणे, भारत से लैंडस्केप और पर्यावरण पुरातत्व में डॉक्टरेट की उपाधि प्राप्त की है। -
डॉ. अरविंद प्रभाकर जामखेडकर
माजी संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय
डॉ. अरविंद प्रभाकर जामखेड़कर 2018-2021 तक भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद (ICHR) के अध्यक्ष थे। वह डेक्कन कॉलेज पुणे के चांसलर हैं, जो कि एक डीम्ड यूनिवर्सिटी है। एक संस्थान जहाँ से उन्होंने 1966 में प्राचीन भारतीय संस्कृति में पीएच. डी. की उपाधि प्राप्त की है। उन्होंने महाराष्ट्र में पुरातत्व एवं संग्रहालय निदेशक के तौर पर भी काम किया है। उन्होंने ताम्रपाषाण, महापाषाण और आरंभिक ऐतिहासिक स्थलों की कई खुदाईयों में हिस्सा लिया है। शास्त्रीय और वैदिक संस्कृत, पाली और अर्धमगधी में पारंगत, उनके अनुसंधान रुचियों की विस्तृत श्रृंखला में पुरातत्व, मंदिर वास्तुकला, कला इतिहास, पुरालेख, बौद्ध धर्म और जैन धर्म और बहुत कुछ सम्मिलित है। -
मीना मुकेश भोईर
घरापुरीचे सरपंच
मीना मुकेश भोईर, घारापुरी गांव की सरपंच (ग्राम प्रधान) के तौर पर कार्यरत हैं, जिसे एलीफेंटा द्वीप भी कहा जाता है, वह इस द्वीप की मूल निवासी हैं तथा उनका अपने समुदाय और विरासत से गहरा संबंध है। एलीफेंटा में जन्मी और पली-बढ़ी श्रीमति बुई ने द्वीप के समृद्ध सांस्कृतिक इतिहास और इसके प्राकृतिक वातावरण के संरक्षण हेतु अपने विशिष्ट पद का लाभ उठाते हुए अपने समुदाय के विकास और कल्याण हेतु स्वयं को समर्पित कर दिया है।
गॅलरी
भागीदार
About the Project
मुंबईजवळील बेटावर वसलेला एलेफंटा लेणी समूह हा इ.स. 5व्या ते 7व्या शतकातील UNESCO जागतिक वारसा स्थळ आहे. हिंदू देवता शंकराला समर्पित या गुंफामंदिरांच्या भूलभुलैय्यात खडकातून कोरलेली उत्कृष्ट कला व वास्तुकला दिसून येते, जी प्राचीन भारतीय कलात्मकतेच्या सर्वोच्च शिखराचे प्रतीक आहे. या संकुलातील मुख्य गुंफा-मंदिरात शंकराच्या विविध रूपांचे दर्शन घडवणाऱ्या अप्रतिम मूर्ती व कोरीव रेखाटनांचे दर्शन घडते. मुख्य गुंफेची 3D माहिती मे 2023 मध्ये CyArk व इन्स्टुसेन ट्रस्ट यांच्या सहकार्याने संकलित करण्यात आली.
संबंधित दुवे
क्रेडिट्स
एलेफंटा गुंफा टेपेस्ट्री टूर Iron Mountain च्या उदार सहाय्याने साकार करण्यात आली. आम्ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (मुंबई सर्कल), इन्स्टुसेन ट्रस्ट मधील डॉ. कुरूष दलाल व डॉ. मुग्धा कर्णिक, तसेच पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्रचे डॉ. तेजस गार्गे यांचे अमूल्य योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. या प्रकल्पाची लेखन-संहिता डॉ. आंद्रे बाप्तिस्ता यांनी कुशलतेने तयार केली. प्रकल्प टीम: ऋद्धी जोशी, योगिनी आत्रेय, कीनन परेरा व गौरव गामरे. संगीत प्रस्तुती: ऋद्धी जोशी. आनुवाद: माधुरी जोशी वॉइस ओवर: ऋद्धी जोशी.
Related experience
Cliff Palace (Opens in new tab) — Explore a cliff dwelling and hear from descendent communities




